हत्या प्रकरणात गुन्हा दाखल
भिवंडी, ता. १५ (वार्ताहर)ः शहरातील भादवड परिसरात एकाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी शांतिनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
भादवड गावातील दत्तनगर परिसरातील मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या व्यक्तीच्या डोक्यावर, गळ्यावर, छातीच्या उजव्या बाजूला, पोटावर दगडाने तसेच इतर कोणत्यातरी हत्याराने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी सचिन जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनंतर शांतिनगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दुखापत करून जीवे मारले म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

