शिक्षकाच्या हातून घडते राज्याचे नेतृत्व

शिक्षकाच्या हातून घडते राज्याचे नेतृत्व

Published on

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : शिक्षक म्हणजे केवळ एक विषय शिकवणारा व्यक्ती नाही; तर तो एक मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि व्यक्तिमत्त्व घडवणारा असतो. समाजात योग्य संस्कार रुजवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे बीज पेरण्यासाठी शिक्षकाचे योगदान अमूल्य असल्याचे मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मंगळवारी (ता. १५) नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षक गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. आपल्या शाळेतील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आज आपण या मंचावर एकत्र आलो आहोत. हे केवळ त्यांचे कौतुक करण्याचेच नव्हे; तर त्यांच्या परिश्रमांना दिलेले एक अभिमानाचे उत्तर आहे. शाळेच्या यशात, विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यात शिक्षकांची भूमिका मोलाची असते. अनेकदा आपल्या मागे उभा राहून प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन करणारा शिक्षक या यशाचा खरा शिल्पकार असतो, असेही मंदा म्हात्रे यांनी सांगितले. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विविध शाळांना सन्मानचिन्ह देऊन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कवी व साहित्यिक अशोक बागवे, नवी मुंबई महापालिका उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, सचिव चित्रा बाविस्कर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com