बदलापुरात संविधान उद्यानाची निर्मिती

बदलापुरात संविधान उद्यानाची निर्मिती

Published on

बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात संविधान उद्यानाचे उद्‍घाटन स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. हा देश संविधानाशिवाय चालूच शकत नाही, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे, या अनुषंगाने संविधान उद्यानाची निर्मिती करण्यात आल्याचे मत या वेळी आमदारांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेच्या माध्यमातून बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा भारत कॉलेज परिसरात देशाच्या संविधानाची महती सांगणाऱ्या आगळ्या वेगळ्या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. शहरात अनेक उद्याने आहेत, ज्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी, वयोवृद्धांना फिरण्यासाठी किंवा नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी सोय करून दिलेली आहे. मात्र, देशाचा कारभार चालत असलेल्या आणि मूळ संविधानाचे महत्त्व; तसेच त्याची महती देशातील प्रत्येक नागरिकाला होणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने बदलापुरात संविधान उद्यानाची निर्मिती करण्यात आली. भारताचे हेच मजबूत संविधान लिहिणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त संविधान उद्यानाचे उद्‍घाटन आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे, शहराध्यक्ष शरद तेली, माजी लोकप्रतिनिधी प्रणिता कुलकर्णी, अण्णा कुलकर्णी व अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते.

भाजप पक्ष नेहमी संविधानाचे महत्त्व ओळखून काम करत आला आहे. देशाच्या संविधानाला कोणीही, कधीही धक्का पोहचवू शकत नाही.
- आमदार किसन कथोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com