उल्हासनगर मालमत्ता कर विभागाने टाकली कात
उल्हासनगर, ता. १५ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेतील मालमत्ता कर विभागाच्या कार्यालयाचा कमालीचा कायापालट करण्यात आला आहे. या विभागाने कात टाकल्याने या कार्यालयाला आदर्श लूक मिळाला आहे. त्यामुळे हे कार्यालय सध्या आयएसओ प्रमाणपत्राच्या स्पर्धेत आले आहे.
आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या निर्देशानुसार मालमत्ता कर विभागाच्या कर निर्धारक व संकलक नीलम कदम यांनी यंदा तब्बल १२६ कोटींच्या वर वसुली करून मागील ११२ कोटींचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अशातच १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत आयुक्तांच्या आदेशान्वये सर्व कार्यालयांत नगर परिषद असताना पासूनच्या कागदपत्रांचे अ-ब-क असे वर्गीकरण करण्यात येत आहेत. कार्यालयाला झळाळी देण्याचे काम विभागप्रमुख करू लागले आहे. आदेशाचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या नीलम कदम यांनी ४० वर्षांपूर्वीच्या कागदोपत्रांच्या तीन विभागांत वर्गीकरण केले आहेत. तसेच, कालबाह्य नोंदीही नष्ट केल्या आहेत. करधारकांसाठी प्रवेश करतेवेळी आणि कार्यालयात विशेष स्लोगन तयार केले आहेत. प्रत्येक कामाचा दैनंदिन तक्ता तयार करण्यात आला आहे. नागरिकांना विभागनिहाय कळण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. नाव हस्तांतरण, नवीन आकारणी यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, किती शुल्क आकारले जाणार, याची माहिती झळकवण्यात आली आहे.
मालमत्ता कर विभाग कार्यालयाचा कायापालट करण्यात आला आहे. हे काम आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. कार्यालयात येणारे नागरिक झालेला बदल पाहून नक्कीच आनंदित होतील.
- नीलम कदम, कर निर्धारक व संकलक, मालमत्ता कर विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

