

अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : घरातून सकाळच्या सुमारास २० हजारांचा लॅपटॉप चोरी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या संदर्भात अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. अंबरनाथ पश्चिम सर्वोदयनगरमध्ये पार्श्वनाथ अपार्टमेंटमध्ये व्यावसायिक रत्नेश प्रदीपकुमार दुबे (२४) राहतात. त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा ११ एप्रिलला सकाळी सातच्या सुमारास अर्धवट उघडा होता. याच वेळी चोरट्याने घरात घुसून एक बॅग आणि २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून पसार झाला. या संदर्भात अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.