मोबाईलची धूम स्टाईलने चोरी

मोबाईलची धूम स्टाईलने चोरी

Published on

मोबाईलची धूम स्टाइलने चोरी
भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : ठाणे ते कल्याण रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल रिक्षाच्या पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी धूम स्टाइलने हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित प्रवेश सोंधी (४६) हे कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील साकेत पॅराडाईज क्लाऊड-९ इमारतीत राहत असून, ते नोकरीसाठी ठाण्याला जाऊन घरी जाण्यासाठी रिक्षाने ठाणे नाशिक वहिनीने प्रवास करतात. रिक्षा दि फर्म हॉटेलजवळ आली असता त्यांच्या मोबाईलवर मेल आल्याने तो पाहण्यासाठी फोन हातात घेतला. त्या वेळी रिक्षाच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी अमितच्या हातातून मोबाईल जबरीने हिसकावून चोरून नेला आहे. याप्रकरणी चोरट्यांवर कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास मपोउनि प्रियंका चौगुले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com