भिवंडीच्या विकासासाठी रणनिती

भिवंडीच्या विकासासाठी रणनिती

Published on

भिवंडी, ता. १५ (बातमीदार): मुख्यमंत्र्याच्या शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, या कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या सभागृहात अतिरिक्त आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील भागधारकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये शहर विकासासाठी औद्योगिक धोरण राबविण्यासाठी प्रोत्साहन तसेच शहर सौंदर्यीकरणाबाबत चर्चा केली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त देविदास पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून बैठकीचे उद्देश नमूद केले. या बैठकीस शहरातील पॉवरलूम, सायझिंग अँड डाईंग असोसिएशन, वेअर हाउस अँड लॉजिस्टिक असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, वाहतूक आणि लॉरी संघटन, टोरंट पॉवर कार्यालय, सिक्युरिटी एजन्सी, अमेझॉन, कामगार मजूर संघटना, कौशल्य प्रशिक्षण संस्था व्हीटीपी, शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमसीएचआय, बिल्डर असोसिएशन, आर्किटेक्चर असोसिएशन, क्रेडाई, भिवंडी प्लॅस्टिक मोती असोसिएशन, भिवंडी डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, मिल स्टेाअर संघटनांना आमंत्रित करण्यात आले. या बैठकीमध्ये शहर विकासासाठी शहरात औद्योगिक धोरण राबविण्यासाठी प्रोत्साहन व पोषक वातावरणाबाबत, तसेच माझी भिवंडी, स्वच्छ भिवंडी अभियान राबविणे आदी विषयांवर चर्चा झाली.
----------------------------------------------
घर बांधणी क्षेत्राला चालना
शहरातील उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक वाढविणे, रोजगारनिर्मिती आणि कंपनी सामाजिक दायित्व निधीतून सौंदर्यीकरण करणे याबाबत चर्चा करण्याकरिता होती. त्यासाठी उपस्थित व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या आवाहनास पाठिंबा दर्शविला, परंतु शहरातील पायाभूत सुविधा रस्ते, पाणी, स्वच्छता, अतिक्रमण इत्यादीमध्ये सुधारणा करण्याची व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी मागणी केली. जेणेकरून सर्व व्यवसायांना चालना मिळेल. तसेच शहरातील घर बांधणी क्षेत्राला चालना मिळेल, अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com