अंबरनाथमध्ये पाच तास वीजपुरवठा खंडित
अंबरनाथमध्ये पाच तास वीजपुरवठा खंडित
पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामांना वेग
अंबरनाथ ता. १५ (वार्ताहर) : वीजवितरण यंत्रणेच्या पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. त्यानिमित्त बुधवारी (ता. १६) सकाळी १० ते १च्या दरम्यान अंबरनाथमध्ये वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. पावसाळ्यातही नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी महावितरणने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अंबरनाथ पूर्व मोरीवली उपकेंद्रातून निघणारी मोरीवली सब स्टेशन ६ देखभाल दुरुस्तीसाठी बुधवारी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरण प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन शाखा ते वडवली मार्केट, आंबेडकर नगर, शिवाजीनगर पोलिस ठाणे या परिसरातील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत बंद राहणार आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामातून वीज वितरण यंत्रणेची कार्यक्षमता व जीवनमान वाढण्यास मदत होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साधारण एप्रिल आणि मे महिन्यात वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे केली जातात. त्यानुसार अंबरनाथ तालुक्यात यावर्षी तापमानाचा पारा चाळीशी पार असतानाही महावितरणचे कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि कंत्राटदाराचे कामगारांनी रणरणत्या उन्हात देखभाल-दुरुस्तीची कामांना सुरुवात केली आहे.
देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी विभागनिहाय इनपॅनलमेंट एजन्सीची (कंत्राटदार) नियुक्ती केली आहे. महावितरणचे नियमित कर्मचारी, बाह्यस्रोत (कंत्राटी) कामगार आणि एजन्सीच्या कामगारांकडून एकत्रितपणे देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पूर्वकल्पना देणारे संदेश नागरिकांच्या मोबाईलवर पाठवले आहेत. देखभाल व दुरुस्तीच्या कामांत वीज वितरण रोहित्र (डीपी), उपकेंद्र तसेच उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्यांची कामे तसेच वीज वितरण यंत्रणेत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

