उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज
उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज
सात आगारांतून २७ जादा बसेस सोडण्याचे नियोजन
अलिबाग, ता. १५ (वार्ताहर) ः उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेक जण आपल्या गावी जातात. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागामार्फत मध्यम व लांब पल्ल्याच्या एसटी बसेस १५ एप्रिल ते १५ जून या कालावाधीत सुरू केल्या जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत. त्याचप्रमाणे अलिबागला पर्यटकांचीही पसंती असल्याने अनेक जण फिरण्यासाठी येतात. प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी सुखरूप जाता यावे, यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाकडून अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरूड, माणगाव, महाड या सात आगारांतून १६ जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.
अलिबाग-बार्शी मार्गे अहमदपूर, अलिबाग-कल्याण मार्गे जळगाव, श्रीवर्धन ताम्हीणी मार्गे तुळजापूर, श्रीवर्धन-कल्याण मार्गे शिर्डी, हरेश्वर-स्वारगेट मार्गे अक्कलकोट, श्रीवर्धन-अहिल्यानगर मार्गे औरंगाबाद, कर्जत-वाशी मार्गे तुळजापूर, रोहा-माणगाव-बार्शी मार्गे लातूर, रोहा-माणगांव मार्गे धाराशिव, रोहा-पाली-अहिल्यानगर मार्गे बीड, मुरूड-खोपोली मार्गे छत्रपती संभाजीनगर, मुरूड-खोपोली-बार्शी मार्गे लातूर, माणगाव-बार्शी मार्गे अहमदपूर, महाड-बोरिवली, श्रीवर्धन-बोर्ली मार्गे नालासोपारा अशा फेऱ्या वेगवेगळ्या वेळेनुसार येता-जाता असणार आहेत.
उन्हाळी सुट्टीमध्ये दरवर्षी प्रवाशांच्या सेवेसाठी जादा एसटी बस फेऱ्या सोडल्या जातात. यावर्षीदेखील १५ एप्रिलपासून नियोजन केले आहे. अलिबागसह माणगाव, महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा, कर्जत या आगारातून या बसेस सोडण्यात येणार आहेत. या फेऱ्यांचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

