

पाच महिन्यांपासून रस्त्याची कामे कासवगतीने
उल्हासनगरमध्ये कोंडीचे चित्र : व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम
दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १५ : रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला असणाऱ्या वीर सावरकर मार्ग ते लालचक्की चौक या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम जवळपास पाच महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण आला असून, सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
कामाची निविदा ही तीन कंत्राटदारांना देण्यात आलेली आहे; मात्र कामे कासवगतीने सुरू आहेत. या मार्गावरून लालचक्की, संभाजी चौक, भाटिया चौक, कुर्ला कुर्ला कॅम्प, व्हीनस चौक, मोर्या नगरी, नेताजी चौक, मठमंदिर, दुधनाका, जुने बसस्थानक, कैलास कॉलनी या भागात रिक्षा धावतात; मात्र हा मार्ग जवळपास पाच महिन्यांपासून काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गावरील वाहतूक ही अंबिका मंदिर, छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल, लालचक्की मार्गे वळवण्यात येत आहे. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते.
वीर सावरकर मार्ग ते लालचक्की चौका पर्यंत हा रस्ता आहे, परंतु सदर रस्ता हा दिव्या नोव्हेलटीपर्यंतच हा रस्ता बनला आहे. पूनम ज्वेलर्ससमोर अजूनही नाल्याचे काम अद्याप सुरू केलेले नाही. आझाद मित्र मंडळ, शंकर मंदिरसमोरील काम अद्याप सुरू केलेले नाही. गायत्री फरसाण, बजरंग बुक डेपो ते वीर सावरकर पुतळा येथील रस्त्याचे काम अजूनही सुरू केलेले नाही. शर्मा डॉक्टर समोरील नाल्याचे काम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ज्यांनी भाड्यावर दुकाने घेतलेली आहेत, त्यांच्यावर उपासमारीची व भाडे देता येत नाही, अशी खंत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी व्यक्त केली आहे.
रिक्षाभाडे पाच रुपयांनी वाढले
महापालिकेने रस्त्यासाठी व ड्रेनेज टाकण्यासाठी जिकडे-तिकडे खोदकाम केलेले आहे. काही महिन्यांपूर्वी कुर्ला कॅम्पला जाणाऱ्या दहाचाळ मार्गावर खोदकाम केले होते. त्यामुळे रिक्षाचालकांना भाटिया चौकातून फेरा मारून जावे लागत होते. त्यामुळे युनियनने १५ रुपये असलेले भाडे पाच रुपयांनी वाढवून ते २० रुपये केलले आहे.
तांत्रिक बाबी
महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, रस्त्याचे जवळजवळ पूर्ण होत आले आहे. काही तांत्रिक बाबी आहेत. त्या दूर केल्यावर वेगाने काम करून हा मार्ग खुला करण्यात येणार, अशी माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.