दुभाजकातील झाडे पाण्याअभावी सुकले

दुभाजकातील झाडे पाण्याअभावी सुकले

Published on

दुभाजकातील झाडे पाण्याअभावी सुकली
अनेक ठिकाणी कचऱ्याच्या गोणी; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरातील रस्ते दुभाजकांमध्ये लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी सुकून गेल्याने त्यांची रया निघून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे, तर काही ठिकाणी झाडे गायब झाली असून, तेथे कचऱ्याच्या गोण्या टाकण्यात आल्या आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गासह एमआयडीसी, एपीएमसीसह काही अंतर्गत रस्ते दुभाजकांमध्ये नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने लहान अशी विविध प्रकारची रोपटी लावण्यात आली आहेत. शोभेसाठी असलेली ही झाडे सुरुवातीच्या काळात दुभाजकांची शान वाढवणारी ठरली. नंतर मात्र या झाडांच्या देखरेखीकडे प्रशासनाने नेमून दिलेल्या ठेकेदारांचे दुर्लक्ष झाले. त्‍यामुळे अनेक दुभाजकातील लहान रोपट्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात सध्या उन्हाचा पारा वाढला असल्याने अनेक शोभेची रोपटी कडक उन्हाच्या झळांनी करपून गेली आहेत, तर काही झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. नियमित पाणी नसल्याने झाडे करपून गेली आहेत, सोबत मातीही कोरडी पडली आहे. तीच परिस्‍थिती तुर्भे स्थानकपासून ब्रिजपर्यंत झाली आहे. येथील दुभाजकांमधील झाडेदेखील पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यात काही झाडांच्या फक्त फांद्याच उरल्या असून, झाडांची हिरवळ नाहीशी झाल्याने दुभाजक भकास दिसत आहे. वाशी, कोपरखैरणे अशा मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या रस्ते दुभाजकातील झाडांना नियमित पाणी व देखरेख केली जाते, मात्र एपीएमसीसारख्या वर्दळीच्या ठिकाणी असणारी दुभाजकातील झाडे देखरेखीआभावी करपून गेली आहेत, तर काही ठिकाणी रस्ते दुभाजकातील झाडे गायब होऊन त्या ठिकाणी कचऱ्याच्या गोणी टाकल्या आहेत.
....................
बहुतांश ठिकाणची झाडांची पाहणी केली आहे. ज्या ठिकाणची झाडे पाण्यामुळे सुकली आहेत, त्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या जातील.
-किसनराव पलांडे, उपायुक्त, उद्यान विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com