३५ ग्रामपंचायतींचे आरक्षण २३ एप्रिलला जाहीर

३५ ग्रामपंचायतींचे आरक्षण २३ एप्रिलला जाहीर
Published on

उरण, ता. १५ (वार्ताहर) : उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचे २०२५ ते २०३० या कालावधीसाठी आरक्षण जाहीर होणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग तसेच महिला यांच्यासाठी सरपंच पदाची आरक्षणाची सोडत २३ एप्रिलला जेएनपीए वसाहतीतील सभागृहात ११ वाजता होणार आहे.
उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे. उरणमध्ये ३५ ग्रामपंचायती असून, त्यापैकी सर्वसाधारण गटातील खुल्या प्रवर्गासाठी ११ व महिलांसाठी ११ जागा आरक्षित आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी खुल्या गटात चार व महिलांसाठी पाच जागा आरक्षित आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन खुल्या; तर एक महिलांसाठी जागा आरक्षित आहे. अनुसूचित जातींसाठी खुल्या गटाला एक जागा सरपंच पदासाठी आरक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. २३ एप्रिलला सोडत पद्धतीने काढण्यात येणारे आरक्षण पुढील पाच वर्षांत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी लागू असेल, असे उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com