पश्चिम बंगालमध्ये हिंदुंवर अत्याचार : नवनीत राणा

पश्चिम बंगालमध्ये हिंदुंवर अत्याचार : नवनीत राणा

Published on

पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार : नवनीत राणा
भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : ‘पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असल्यापासून ममता दीदी यांनी हिंदूंवर अत्याचार केले आहेत. हिंदुत्वाला विरोध करून एवढे वर्ष ममता दीदी सत्तेवर बसल्या आहेत. बांगलादेशात जसे हिंदूंना हाकलून दिले जात आहे; तसे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी करू पाहत आहेत, पण आता देशात हिंदुत्व विचारांचे सरकार आहे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी होणार आहे, गरज पडली तर हजारो हिंदुत्व विचारांचे कार्यकर्ते पश्चिम बंगाल येथे जाऊन ममता दीदी यांना त्यांची जागा दाखवतील.’ अशी टीका माजी खासदार नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर सोमवारी (ता. १४) केली. भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे येथे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या पुढाकाराने बनवण्यात आलेल्या श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ दर्शनासाठी सोमवारी सायंकाळी त्या आल्या होत्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘पंडित धीरेंद्र शास्त्रींनी हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी संकल्प केला आहे; त्यांच्यासोबत आमच्या सारखे भक्त जोडले गेले आहोत. गुरुजींच्या या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com