ठाण्यात एका दिवसात ६६५ बॅनर्स, होर्डिंग्जवर कारवाई
बेकायदा फलकांपासून ठाणेमुक्त
एका दिवसात ६६५ बॅनर्स, होर्डिंगवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, हे ब्रीदवाक्य घेऊन ठाणे पालिकेने शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार मंगळवारी पालिका प्रशासनाने एका दिवसात ६६५ बेकायदा पोस्टर्स, बॅनर्सवर कारवाई केली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील पोस्टर्स, होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. तसेच अनेकदा वाऱ्यामुळे अशा प्रकारचे होर्डिंग पडून दुर्घटना होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग आयुक्तांच्या निर्देशानुसार हटविण्यात येत असून, ही मोहिम सातत्याने सुरू राहील, असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले. विजेच्या खांबावर, झाडांवर, रस्त्याच्या दुभाजकांवर, रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅनर्स काढण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे, सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
...............................
प्रभाग समिती कारवाई
नौपाडा ७६
कोपरी ५४
वागळे ५५
लोकमान्य सावरकरनगर ६६
वर्तकनगर ६५
माजिवडा मानपाडा ६७
उथळसर ५३
कळवा ७२
मुंब्रा ७५
दिवा ८२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

