माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपात प्रवेश

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपात प्रवेश

Published on

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपमध्ये प्रवेश

शहापूर, ता. १५ (वार्ताहर) : शहापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा पराभूत झालेले माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसऱ्यांदा साथ सोडत मंगळवारी (ता. १५) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. बरोरा यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून, हा प्रवेश भाजपला तालुक्यात राजकीय बळकटी देणारा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बरोरा यांच्या भाजप प्रवेशाने एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जरी धक्का दिला असला तरी दुसरीकडे खुद्द भाजपमधील विधानसभा निवडणुकीतील स्पर्धकांनादेखील त्यांनी धक्का दिला आहे. याआधी पक्षात मीच विधानसभेचा उमेदवार होणार म्हणून आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्यांना बरोरांच्या भाजप प्रवेशाने गारद केले आहे. शहापूर भाजपच्या तालुका कार्यकारिणीतही करण्यात येणारे बदल मागील काही महिन्यांपासून लांबविण्यात आले होते. आता बरोरा समर्थकांचा मोठा गट पक्षात दाखल झाल्याने पुढल्या कालावधीत होणाऱ्या तालुका कार्यकारिणीतल्या बदलांवर बरोरा समर्थकांची विशेष छाप राहणार आहे. त्यामुळे तालुका अध्यक्ष व इतर पदांसाठी आधीपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या संभाव्य इच्छुकांनादेखील या प्रवेशाने बाजूला सारल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com