मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवाणी

मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवाणी

Published on

मराठी चित्रपट महोत्सवात ४१ चित्रपटांची मेजवानी
आशीष शेलार यांची घोषणा

मुंबई, ता. १५ : मुंबईच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव-२०२५’ आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या ४१ चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी आज मंत्रालयात केली.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. उद्‍घाटन सोहळ्यानंतर रात्री ८ वाजता रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखविण्यात येणार आहे, तर २४ एप्रिलला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट क्लोजिंग फिल्म म्हणून दाखविण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर आणि प्रायोगिक रंगमंच येथे हे सर्व चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यासोबतच विविध परिसंवाद आणि कार्यशाळा होतील.
...
कोणते चित्रपट कधी?
- २२ एप्रिलला ‘पळशीची’, ‘बटरफ्लाय’ आणि ‘येरे येरे पावसा’ ‘बाईपण भारी देवा’, ‘विषय हार्ड’ आणि ‘तिचं शहर होणं’, ‘इंटरनॅशनल फालमफोक’, ‘ग्लोबल आडगाव’ आणि ‘या गोष्टीला नावच नाही’, ‘गोदाकाठ’, ‘पाणी’, ‘झॉलिवूड’, ‘भेरा’, ‘चोरीचा मामला’ आणि ‘पॉडीचेरी इत्यादी चित्रपट दाखविण्यात येतील.
- २३ एप्रिलला ‘तेरव’, ‘पोटरा’, ‘गिरकी’ ‘शहिद भाई कोतवाल’ ‘जयंती’, ‘गाभ’, ‘फनरल’, ‘स्थळ’, ‘अमलताश’, ‘कुलूप’, ‘मी वसंतराव’, ‘बापल्योक’ आणि ‘गोदावरी’ आदी चित्रपट दाखविले जातील.
- २४ एप्रिलला ‘जुनं फर्निचर’, ‘मदार’, ‘पावनखिंड’ आणि ‘कारखानिसांची वारी’, ‘वाळवी’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘वाय’ इत्यादी चित्रपट दाखविले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com