ठाणे -बोरीवली भुयारी मार्ग ; बैठक पुढे ढकलली
ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग अधांतरी
एमएमआरडीएने मंगळवारी होणारी बैठक पुढे ढकलली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : राज्य शासनाच्या बहुचर्चित ठाणे-बोरिवली या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने एमएमआरडीएचे अधिकारी आणि रहिवाशांची मंगळवारी सायंकाळी बैठक होणार होती, पण बैठकीची तारीख आणि वेळ प्राधिकारणामार्फत लवकरच कळविण्यात येईल, असा संदेश एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना पाठवल्याने ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग प्रश्न सध्यातरी अधांतरी राहिला आहे.
मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे हिरवाईने नटलेले डोंगर आणि दुसरीकडे जुन्या वृक्षांमुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत भागात नेहमी गारवा असतो. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या परिसरात सुमारे १२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करतात, मात्र गेल्या काही महिन्यांपासून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गामुळे त्यांच्या शांततेत भंग पडला आहे. या भागात एमएमआरडीएकडून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामामुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढले आहे. याविरोधात शनिवारी स्थानिकांनी आंदोलन केले होते. या वेळी महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. या वेळी रस्ते मार्गाऐवजी मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. तसेच या प्रश्नावरून तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

