दिव्यात रस्त्यावर चूल मांडत आंदोलन

दिव्यात रस्त्यावर चूल मांडत आंदोलन

Published on

दिव्यात रस्त्यावर चूल मांडत आंदोलन
ठाकरे गटाची सरकारविरोधात घोषणाबाजी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातच आता घरगुती पीएनजी आणि वाहनांच्या सीएनजी गॅसच्या किमतीत दरवाढ झाल्याने नागरिक या दरवाढीने त्रस्त झाले आहेत. या दरवाढीविरोधात दिव्यात शिवसेना ठाकरे गटाने अनोखे आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला. स्थानक परिसरात रस्त्यावर चूल मांडत भाकरी थापून या वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

भाजप सरकारविरोधात मंगळवारी (ता. १५) दिव्यात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. दिव्यात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा दणका दिला. मुंबईसह उपनगरात सीएनजी दीड रुपयाने, तर पीएनजी म्हणजे घरगुती पाइप गॅस एक रुपयाने महागला आहे. त्यामुळे आता सीएनजी ७९.५० रुपये प्रतिकिलो, तर पाइप गॅस प्रतियुनिट ४९ रुपये झाला आहे. घरगुती गॅससाठीचा खर्च वाढला असून, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर वधारल्यामुळे गॅसच्या किमती वाढवावे लागल्याचे एमजीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हेच का मोदीचे अच्छे दिन, असा सवाल विचारत दिव्यात ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने गॅस दरवाढीविरुद्ध निषेध आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील, विभाग संघटिका मयूरी पोरजी यांनी केले. या वेळी उपशहरप्रमुख तेजस पोरजी, उपशहर संघटक प्रवीण उतेकर, विभागप्रमुख नागेश पवार, संजय जाधव यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सिलिंडरचे दर गगनाला
महिलांनी चुलीवर भाकरी बनवून भाजप सरकारचा निषेध केला. सिलिंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करत आहेत. देशात उज्ज्वला योजना राबवून मोदींनी मन की बातमध्ये म्हटले होते की महिलांचे धुराचे अश्रू मला पाहवत नाहीत. म्हणून उज्ज्वला योजना राबवण्यात आली, परंतु आज याच सिलिंडरचे दर गगनाला भिडलेले असून, सामान्य महिलांचे हाल होत आहेत व पुन्हा चुलीवर जेवण बनवण्याची परिस्थिती देशात मोदी सरकार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com