मेट्रो - ५ साठी अंजुरफाटा येथे एमएमआरडीएकडून महाकाय गर्डर बसवला

मेट्रो - ५ साठी अंजुरफाटा येथे एमएमआरडीएकडून महाकाय गर्डर बसवला

Published on

मेट्रो-५ चा महाकाय गर्डर बसवला
४५६ मेट्रिक टन वजन, ६५ मीटर लांबी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ मार्गिकेवर एमएमआरडीएने मंगळवारी (ता. १५) तब्बल ४५६ मेट्रिक टन वजनी आणि ६५ मीटर लांबीचा महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवला. मध्य रेल्वेच्या वसई-दिवा मार्गावर अंजुरफाटा (भिवंडी) येथे हा ओपन वेब गर्डर बसवला आहे. त्यामुळे या मेट्रोच्याकामाला आता वेग येणार आहे.
वसई-दिवा मार्गावर नेहमीच मालगाड्यांसह प्रवासी ट्रेनची वर्दळ असते. त्यामुळे मेट्रोसाठी रेल्वे क्राॅसिंगच्या ठिकाणी अवजड वजनाचा महाकाय गर्डर बसवण्याचे मोठे आव्हान एमएमआरडीएसमोर होते; मात्र चोख नियोजनाच्या जोरावर एमएमआरडीएने हे काम तीन टप्प्यात पूर्ण केले आहे. या मार्गिकेवरील इतर कामांपेक्षा अंजुरफाटा येथे गर्डर बसवण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे एमएमआरडीएला आता उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com