पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळित

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळित

Published on

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळित


पालघर, ता. १५ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि कळवे रोड या रेल्वेस्थानकांदरम्यान बिकानेर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये मंगळवारी (ता. १५) सायंकाळी बिघाड झाला. त्यामुळे गुजरातकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळित झाली; या इंजिनमधील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर ही गाडी सायंकाळी सव्वा पाच वाजता मार्गस्थ करण्यात आली. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या बिकानेर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये सफाळे-केळवे रोड रेल्वेस्थानकांदरम्यान मंगळवारी (ता. १५) दुपारी साडेतीनच्या सुमारास बिघाड झाल्याने ही गाडी जागीच थांबली. परिणमा डहाणू व पुढे गुजरातकडे या वेळेत धावणाऱ्या उपनगरी रेल्वेसह लांब पल्ल्याच्या सेवा जवळपास अर्धातास ठप्प झाल्या. तरी मुंबईकडे जाणारी सेवा सुरळीत सुरू होती. इंजिनमधील बिघाड दुरुस्त केल्यानंतर बिकानेर एक्स्प्रेस सव्वा पाच वाजता गुजरातकडे रवाना करण्यात आली; त्यानंतर यामार्गावरील सेवा सुरळीत सुरू झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com