विकासकाने लाॅटरी विजेत्याला लावलेले व्याज माफ होणार

विकासकाने लाॅटरी विजेत्याला लावलेले व्याज माफ होणार

Published on

विकसकाने लाॅटरी विजेत्याला
लावलेले व्याज माफ होणार
म्हाडाच्या लोकशाही दिनात निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : म्हाडाच्या सर्वसमावेशक योजनेंतर्गत काढलेल्या घरांच्या लाॅटरीत विजेत्या ठरलेल्या अर्जदाराला म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. संबंधिताला घराची रक्कम भरण्यास विलंब झाल्याने विकसकाने त्याला व्याज आकारले होते. त्यावर लोकशाही दिनात झालेल्या सुनावणीत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सुमारे एक लाख ७० हजार रूपयांचे व्याज माफ करण्यासाठी संबंधित विकासकाशी बोलण्याचे निर्देश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले.
म्हाडाच्या गृहनिर्माण भवनात मंगळवारी (ता. १५) संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली दहावा लोकशाही दिन पार पडला. यावेळी नागरिकांच्या १० अर्जांवर सुनावणी घेत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार मोहम्मद खान हे कोकण मंडळाच्या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ठाणे येथील संकेत क्रमांक ३६८ मधील सदनिकेसाठी यशस्वी अर्जदार ठरले होते; मात्र सदनिकेची विक्री किंमत भरताना विलंब झाल्याने विकसकाने आकारलेले व्याज माफ केले जावे म्हणून, त्यांनी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी विकसकाशी बोलून संबंधित अधिकाऱ्यांना खान यांचे एक लाख ७० हजार रुपयांचे व्याज माफ करण्याचे निर्देश दिले. याशिवाय इतरही अर्जांवर योग्य निर्णय देत म्हाडाच्या उपाध्यक्षांनी संबंधितांना दिलासा दिला. लोकशाही दिनात म्हाडा मुंबई मंडळ व कोकण मंडळाशी संबंधित प्रत्येकी चार अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. तसेच मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ व पुणे मंडळाशी संबंधित प्रत्येकी एका अर्जावर सुनावणी घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com