‘शेकाप’च्या पंडित पाटील यांचा आज भाजप प्रवेश
‘शेकाप’च्या पंडित पाटील यांचा आज भाजप प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : रायगडमधील शेकापचे माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील हे बुधवार (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पेणचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आले. त्यानंतर आता शेकापला हा दुसरा मोठा धक्का आहे. पंडित पाटील यांच्याबरोबरच माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचा मुलगा आस्वाद पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शेकापचे सर्वेसर्वा असलेले जयंत पाटील यांचे बंधू असलेले पंडित पाटील हेच पक्षांतर करणार असल्याने रायगडच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जात आहे. मुंबईतील भाजपाच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश दुपारी १२.०० वाजता होणार आहे. प्रमुख कार्यक्रमात काही निवडक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. या पक्षप्रवेशासाठी पंडित पाटील गटाचे रोहा, मुरुड, अलिबाग, पेण येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होणार असून, यातून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

