चार दिवसांत सहा अल्पवयीन मुलांचे अपहरण

चार दिवसांत सहा अल्पवयीन मुलांचे अपहरण

Published on

चार दिवसांत सहा अल्पवयीन मुलांचे अपहरण
भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : भिवंडी शहरात अल्पवयीन मुलामुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील चार दिवसांत पाच मुली आणि एका मुलाच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. यामुळे पालकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता. १५) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास गुलझार नगर परिसरातील समरीन इसरार पठाण (वय १३) ही कोणाला काहीही न सांगता घराबाहेर गेली होती. या वेळी कोणीतरी अज्ञाताने प्रलोभन दाखवून अपहरण केल्याची तक्रार तिची आई शबानाने शांतीनगर पोलिस ठाण्यात केली आहे, तर भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीतील सना (सिंध्या) मुकीम चौधरी (वय १६) सोमवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहा वाजता दुकानात चिप्स आणायला जात असल्याचे सांगून गेली. बराच उशीर होऊनही ती घरी न परतल्याने तिचा मामा समीर सलीम कुरेशी याच्या फिर्यादीवरून अज्ञाताच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी (ता. १२) संध्याकाळी साडेसात वाजता शांतीनगर वंजारपट्टी नाका परिसरातील रिफा मुसा खान (वय १७) आइस्क्रीम घेण्यासाठी खाली गेली, पण रात्री उशिरापर्यंत ती परतली नाही. नातेवाइकांनी शोध घेऊनही ती न सापडल्याने तिची आई समबानो मुसा खान यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे, तर दुसऱ्या घटनेत रविवारी रात्री ९ वाजता कोनगाव पोलिस ठाणे परिसरातील किशोरी निशा मुकेश पांडे (वय १५) हिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. याप्रकरणी पीडितेची आई शकुंतला मुकेश पांडे यांनी कोनगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

शांतीनगरमधील रहमतपूर भागातील रेहान वकील अहमद अन्सारी (वय १६) बेपत्ता झाल्याची बातमीही समोर आली. या अपहरणप्रकरणी रेहानची आई अनिसा बानो वकील अहमद अन्सारी यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, तर बरफ गल्ली काप कणेरी येथील सायमा मोहम्मद शफीक खान (वय १५) मंगळवारी पहाटे पाऊणेसात वाजता कोणालाही न सांगता घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. तिचा कुटुंबीयांनी नातेवाइकांमध्ये शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com