

पालिका निवडणुका पुढच्या वर्षी : वनमंत्री गणेश नाईक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ‘राजकीय क्षेत्रात वावरताना नगरसेवक, सभागृह नेते, महापौर, आमदार-नामदार ही पदे म्हणजे अळवावरचे पाणी असते. काही लोकांना पैशांचा माज असतो. काहींना खुर्चीचा साज असतो, तर काहींना मोठेपणा मिरवण्याची सवय असते. हे सर्व मातीत जाते; त्यामुळे माणुसकीचे जतन करा, असा सल्ला देताना, यंदाच्या वर्षी महापालिका निवडणुका होतील, असे मला वाटत नसल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी (ता. १७) रात्री एका कार्यक्रमात बोलताना केले. नाईक यांनी ३५ वर्षांनी बाळकुम गावाला भेट दिली, या वेळी त्यांनी निवडणुकीविषयी भाष्य केले.
ठाणे बाळकुम येथे आई एकवीरा मित्र मंडळ बाळकुम यांच्या विद्यमाने ‘बाळकुम (ठाणे) ते एकवीरा (कार्ला)’ अशी आई एकवीरा देवीच्या चैत्र सप्तमी यात्रेनिमित्ताने आयोजित होणाऱ्या ‘मानाची बाळकूम ठाण्याची- पदयात्रा व पालखी’ या सोहळ्यास २१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित सोहळ्याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, संकल्प नाईक, मंडळाचे अध्यक्ष समीर भोईर, धनंजय सिंह, गजानन चौधरी, मेघनाथ घरात, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी गणेश नाईक म्हणाले, की, माणुसकी जतन केली, तर त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी येते. मंडळाचे अध्यक्ष समीर भोईर याला जिल्हास्तरावर काम करण्यासाठी आपल्या एकजुटीने ताकद देऊ, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.