चौकजवळील पुलावर बसवले पाच गर्डर

चौकजवळील पुलावर 
बसवले पाच गर्डर
Published on

चौकजवळील पुलावर
बसवले पाच गर्डर
पनवेल-कर्जत मार्गिकेतील महत्त्वाचा टप्पा मार्गी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाचे काम वेगाने सुरू आहे. चौक रेल्वेस्थानकाजवळील पुलाचे (आरओबी) पाच ‘आय’ प्रकारचे गर्डर एकाच वेळी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.  या पुलासाठी ४८.३ मीटर लांब, २.५ मीटर खोल गर्डर वापरण्यात आले आहेत. प्रत्येक गर्डरचे वजन सुमारे ८० टन आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) देण्यात आली.
महामुंबईतील प्रवाशांना नव्या रेल्वे मार्गाचा पर्याय म्हणून पनवेल-कर्जत या उपनगरी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मुळे पनवेलमार्गे कर्जतला जाण्याचा हा मार्ग प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. पनवेल-कर्जत हा मार्ग जुना मुंबई-पुणे महामार्गाजवळून जात असून या मार्गावर विविध ठिकाणी रोड ओव्हर ब्रिजचे (आरओबी) काम सुरू आहे. चौक येथील आरओबी क्रमांक ८९/१साठी पाच ‘आय’ प्रकारचे गर्डर टाकण्याचे काम गुरुवारी (ता. १७) मध्यरात्रीनंतर १२.१२ ते शुक्रवारी पहाटे २.५९ या वेळेत करण्यात आले. हे गर्डर बसवण्यासाठी ७०० टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात आला. याशिवाय एक स्टँडबाय क्रेन, तीन हायड्रा क्रेन आणि एक पोकलेन मशीनही सज्ज ठेवण्यात आली होती. सुमारे ७० कामगारांसह ‘एमआरव्हीसी’चे वरिष्ठ अभियंते, कंत्राटदार आणि जनरल कन्सल्टंटचे अधिकारी उपस्थित होते.  पनवेल-कर्जत उपनगरी मार्ग डिसेंबर २०२५पर्यंत प्रवासी सेवेत सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती ‘एमआरव्हीसी’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

 -------
दृष्‍टिक्षेपात प्रकल्प
- खर्च : २,७८२ कोटी
- एकूण प्रगती : ७१ टक्के
- प्रकल्प पूर्ण  : डिसेंबर २०२५
------
महत्त्वाची पायाभूत कामे :
- प्रमुख पूल : ९ पैकी ६ पूर्ण
- किरकोळ पूल : ३५ पैकी ३३ पूर्ण
- आरओबी : एक पूर्ण, चार ठिकाणी काम सुरू
- आरयूबी : १६ पैकी १५ पूर्ण
- बोगदे : तीन (सर्वांचे खोदकाम पूर्ण, पूरक कामे सुरू)
- स्थानके : पाच (पनवेल, चिखले, मोहपे, चौक, कर्जत - सर्व ठिकाणी काम सुरू)
- ट्रॅक वर्क : ट्रॅक लिंकिंग सुरू, बॅलेस्टचे काम सुरू, पीएससी स्लीपरचे अनलोडिंग सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com