मुंबईत ''वृक्ष संजीवनी अभियान २.०'' सुरू

मुंबईत ''वृक्ष संजीवनी अभियान २.०'' सुरू
Published on

मुंबईत ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ सुरू
झाडांवर अनधिकृतपणे लावलेले फलक, केबल, खिळे काढण्यास उद्यान विभागाच्या पथकाकडून सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईतील वृक्षांच्या संवर्धनासाठी पालिकेने ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ सुरू केले आहे. मुंबईतील वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. झाडांवर खोचलेले फलक, खिळे, केबल्स काढण्यात येत आहेत. येत्या ३० एप्रिलपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी पालिकेने हे अभियान हाती घेतले आहे.
या जनजागृती अभियानात उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागातील रस्त्यालगतच्या वृक्षांवर नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
पालिका हद्दीतील वृक्षांचे आरोग्य सुधारावे, त्यांची वाढ व्हावी, जोपासना व्हावी, यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार आणि उपआयुक्त (उद्याने) अजीत आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे.  पालिकेने सन २०२२ मध्ये सर्वप्रथम हे अभियान हाती घेतले होते. पहिल्या टप्प्यात हे अभियान यशस्वी झाले होते. त्यामुळे आता अभियानाचा पुढचा टप्पा हाती घेण्यात आला आहे.


-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com