

स्टेम प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला कल्याण सापड गाव येथे शुक्रवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास गळती लागल्याने भिवंडी शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहरातील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार असल्याची माहिती पालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी दिली आहे. ही दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री सुरू केल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी २४ तास लागणार असल्याने या काळात पाणीपुरवठा बंद राहणार असून पुढील २४ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.