अश्लिल चाळे करणारा तरुण ताब्यात

अश्लिल चाळे करणारा तरुण ताब्यात
Published on

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : उद्यानामध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलांना पाहून अश्लील चाळे व हावभाव करून महिलांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न करणाऱ्या एका तरुणाला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. सनी पंचू यादव (३०) असे या तरुणाचे नाव आहे.
अश्लील चाळे करताना पकडला गेलेला आरोपी सनी यादव हा वाशीतील कोपरी गावात राहण्यास असून तो कोपरखैरणे सेक्टर ११मधील हाजी फकीर मोहम्मद पटेल या उद्यानामध्ये सकाळ-संध्याकाळ जात होता. या उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांना पाहून तो अश्लील चाळे व हावभाव करत होता. याबाबतच्या तक्रारी काही महिलांनी वाशी सेक्टर २८ मधील समाजसेविकेकडे केल्या होत्या. त्यामुळे त्याबाबत खात्री करण्यासाठी समाजसेविका गुरुवारी सकाळी त्या उद्यानामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी सनी यादवने या समाजसेविकेला पाहून अश्लील चाळे व हावभाव केले. त्यामुळे या समाजसेविकेने तत्काळ ११२ नंबरवर कॉल करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्याठिकाणी कोपरखैरणे पोलिस दाखल झाले व सनी यादव याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com