दहशतवादी हल्ल्याचा निषेध

दहशतवादी हल्ल्याचा निषेध
Published on

वाशी, ता. २६ (वार्ताहर) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या (शिंदे गट) युवासेना आणि महिला आघाडीतर्फे गुरुवारी (ता. २४) वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. या भ्याड हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत, पाकिस्तानचा झेंडा फाडून आणि दंडाला काळ्या पट्ट्या बांधून या दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
युवासेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध सभेला स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. हातात निषेध फलक, काळे झेंडे आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी दशतवाद्यांविरोधात संताप व्यक्त केला. पहलगाममध्ये सर्वसामान्य नागरिकांवर झालेला हा भ्याड हल्ला आपल्या देशाच्या शांततेवर झालेला हल्ला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या दहशतवादी प्रवृत्तीचा परिचय दिला आहे. आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो. तसेच उरी, बालाकोटमधील दहशतवादी हल्ल्यात जसे भारतीय सेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले तसेच प्रत्युत्तर आताही देण्यात येईल, असे युवासेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com