अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घ्या!

अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घ्या!
Published on

वाशी, ता. २६ (बातमीदार) : पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्लाचा बदला घ्या, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या वतीने नवी मुंबईत आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामध्ये स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात जिल्हा संपर्कप्रमुख एम. के. मढवी, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, संतोष घोसाळकर, मनोज इसवे, सुमित्र कडू, उपजिल्हा संघटक विनिया मढवी, नीशा पवार, प्रणाली कदम, विनोदनी अहिरे, शहरप्रमुख महेश कोटीवाले, उपशहर प्रमुख समीर बागवान, शत्रुघ्न पाटील, एकनाथ दुखंडे, सुनील गव्हाणे, अशोक सकपाळ, सतीश रामाने विशाल विचारे, मिलिंद भोईर, नरेश चाळके, अ‍ॅड. ज्ञानेश्वर कवळे, संदीप पवार, विजय चांदोरकर, अन्वर खान, अ‍ॅड. कौस्तुभ मोरे, नितीन देसाई, अजय पवार आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com