

वाडा, ता. २६ (बातमीदार) : तालुक्यातील सापरोंडे-मांगाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण कामप्रकरणी १९ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून सरपंचावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील सापरोंडे-मांगाठणे या ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा सुनील गवारी यांनी ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरणाच्या कामाच्या मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी दोन टक्क्यांप्रमाणे एकूण २० हजारांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सरपंच गवारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची पडताळणी गुरुवारी (ता. २४) केली असता सरपंचांनी २० हजारांची लाच घेण्याची तयारी दर्शवली होती. शुक्रवारी (ता. २५) कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचण्यात आला होता. सरपंचांनी तक्रारदाराकडून तडजोडीअंती १९ हजारांची रक्कम घेतली. त्यानंतर त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.