

उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : उल्हासनगर रेल्वेस्थानकाच्या परिसरातील पानटपरीवर फुकट सिगारेट न मिळाल्याने संतापलेल्या गुंडाने काम करणाऱ्या युवकावर धारदार शस्त्राने वार करत जीवघेणा हल्ला केला. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी केवळ १२ तासांत या आरोपीला अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प ३ येथील रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या पानटपरीवर काम करणाऱ्या समवेल म्हस्के या युवकावर २१ एप्रिलला रात्री ९च्या सुमारास जुन्या वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. समवेल हा स्थानक परिसरातील एका पानटपरीत काम करत होता. याच टपरीवर नेहमी फुकट सिगारेट व तंबाखू घेण्यासाठी येणारा रोहित शिंदे याने काही महिन्यांपूर्वी समवेलसोबत वाद घातला होता. समवेलने त्याच्या मागण्यांना वारंवार नकार दिल्याने शिंदेच्या मनात राग होता. त्यानंतर शिंदे पुन्हा टपरीवर आला आणि फुकट सिगारेट मागितली. यावेळीही समवेलने स्पष्ट नकार दिला. याच क्षणी शिंदेने मनात धरलेला राग उफाळून आला. त्याने अचानक धारदार शस्त्र काढून समवेलच्या डोक्याला, हाताला व पोटावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समवेलला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून अवघ्या १२ तासांत रोहितला अटक केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.