

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : कासारवडवली परिसरात स्पा आणि मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसायासाठी आलेल्या दोन महिलांसह एका पुरुषाला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सात पीडित महिलांची सुटका केली आहे.
ठाणे शहरातील कासारवडवली परिसरात स्पा/मसाजच्या नावाखाली पीडित तसेच असहाय्य महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी दोन महिला दलाल, एक पुरुष दलालाला अटक केली. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.