बाभळे ग्रामपंचायत बक्षिसाची मानकरी

बाभळे ग्रामपंचायत बक्षिसाची मानकरी
Published on

किन्हवली, ता. २६ (बातमीदार)ः माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयक विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये कोकण विभागातून शहापूर तालुक्यातील बाभळे ग्रामपंचायतीने विभागस्तरावर तृतीय क्रमांक पटकावत १५ लाखांचे पारितोषिक मिळविले.
निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश पंचतत्त्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवन पद्धतीसाठी राज्य सरकारच्या पर्यावरण, वातावरणीय बदल विभागाअंतर्गत माझी वसुंधरा अभियान राबविले आहे. या उपक्रमात बाभळे ग्रामपंचायतीने पारितोषिक पटकावले आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नुकताच एका कार्यक्रमात बाभळे ग्रामपंचायतीचा पुरस्काराने सन्मान केला आहे. या वेळी सरपंच विशाल मुकणे, उपसरपंच सोनल आवार, ग्रामसेविका सरिता फर्डे तसेच वसुंधरा संजीवनी मंडळाचे अनंत भागवत, ग्रामस्थ, महिला बचत गट, तरुण मंडळ पर्यावरणदूत, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक वृंद, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने यश मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com