

खालापुरात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप
खालापूर, ता. २६ (बातमीदार) ः खालापुरात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेण्यात आला आहे. २०११च्या जनगणनेच्या आधारे करण्यात आलेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीस माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे आणि कार्यकर्त्यांनी लेखी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांना पत्र दिले आहे. तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांची आरक्षण सोडत खालापूर पंचायत समिती कार्यालय येथे बुधवारी आयोजित करण्यात आली होते. सोडतीच्या सुरुवातीला सुरेश गावडे, गजानन साळवी, मधुकर गोविंद गुरव, नरेंद्र शंकर पार्ट, उमेश विठ्ठल साळवी, किशोर किसन मोरे यांनी आक्षेप घेतला. सरपंच आरक्षण सोडत तत्काळ रद्द करावी, नव्याने व वास्तव आकडेवारीच्या आधारे आरक्षण निश्चित करण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुरेश गावडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.