

यूपीएससीमध्ये मुलुंडची अंकिता पाटीलचे यश
मुंबईत दुसरी, देशात ३०३वा क्रमांक
मुलुंड, ता. २४ (बातमीदार) ः मुलुंडची रहिवासी अंकिता पाटील हिने यूपीएससी २०२४च्या निकालात उल्लेखनीय कामगिरी करीत देशभरात ३०३वा क्रमांक मिळवला. मुंबई शहरात ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने हे यश आपल्या तिसऱ्या प्रयत्नात मिळवले.
अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर तिने काही काळ खासगी क्षेत्रात काम केले. प्रशासकीय सेवेत जाण्याचे तिचे स्वप्न होते. तिचे वडील प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा तिला कायम मिळाली. त्यामुळे तिने नोकरी सोडून संपूर्ण लक्ष यूपीएससीच्या तयारीकडे वळवले.
पहिल्या प्रयत्नात तिला प्रीलिम्स परीक्षेत अपयश आले. दुसऱ्या वेळेस ती मुलाखतीपर्यंत पोहोचली, पण अंतिम यादीत केवळ एका गुणामुळे स्थान मिळाले नाही. दरम्यान, ती खचली नाही. तिसऱ्या प्रयत्नात तिने अखेर आपले स्वप्न साकार केले.
अंकिता केवळ अभ्यासातच नव्हे तर खेळातही अग्रेसर आहे. ती राष्ट्रीय स्तरावर स्क्वॉश खेळली असून, यूपीएससीच्या तयारीदरम्यानही खेळाडूवृत्ती आणि मानसिक तग धरण्याची वृत्ती तिने जपली. माझे आईवडील हेच माझे खरे प्रेरणास्त्रोत आहेत, असे तिने सांगितले.
तिच्या अभ्यासाचा दिनक्रम अत्यंत शिस्तबद्ध होता. दररोज आठ ते दहा तास अभ्यास, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या गोष्टींमुळे ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सशक्त राहिली. सोशल मीडियाचा वापरही तिने मर्यादित ठेवत फोकस कायम राखला.
यूपीएससीच्या मार्गक्रमणात ‘युनिक अकॅडमी’चे गणेश शेट्टी आणि कल्पेश तटकरे यांचे आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे यांचे मार्गदर्शन तिला फार मोलाचे ठरले. तिच्या या यशामुळे संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.