अतुलनीय कलाकारांची ‘स्वरबंध’ मैफल

अतुलनीय कलाकारांची ‘स्वरबंध’ मैफल
Published on

मुंबई, ता. २६ : ‘महाराष्ट्र दिन’ हा मराठी नागरिकांसाठी अभिमानाचा, गौरवाचा दिवस असतो. त्याचे स्मरण हे संगीताच्या, स्वरांच्या माध्यमातून करायचे झाले, तर त्यातसुद्धा संकल्पना ही असायला हवी. ती संकल्पना नेहरू सेंटरने आपल्या उपक्रमात आणलेली आहे. या सांस्कृतिक प्रवासात ज्या अतुलनीय गायक, संगीतकार, संयोजक, आयोजकांनी योगदान दिले, त्या दिग्गजांना विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे. हे सर्व स्वरमयी कलाकार ‘स्वरबंध महाराष्ट्राचे’ या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत.
१ मे महाराष्ट्र दिन हा दिवस या कार्यक्रमासाठी समर्पक मानलेला आहे. वरळीच्या नेहरू सेंटरने सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांची बहारदार मैफल शुक्रवारी (ता. २) सायंकाळी ६.४५ वाजता रंगणार आहे. प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आनंद केंद्राच्या नाट्यगृहात विनामूल्य घेता येणार आहे. ज्या गायक, संगीतकारांनी प्रदीर्घ प्रवासात उज्ज्वल यश मिळवले, अशा अतुलनीय कलाकारांचा हा कार्यक्रम आहे. यात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री फैय्याज शेख, ‘सुनहरी यादे’ या वाद्यवृंदामुळे जगभर परिचयाच्या असलेल्या ज्येष्ठ गायिका प्रमिला दातार यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. उत्तरा मोने यांच्या सूत्रसंचालनात हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने त्यांचा स्वर हा प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. पण त्याही पलीकडे काही आठवणी जागवल्या जाणार आहेत. याचे संयोजन ‘मिती क्रीएशन’ या संस्थेने केले आहे. विनामूल्य प्रवेशिका केंद्राच्या आरक्षण खिडकीवर सोमवारी (ता. २८) सकाळी १०.३० वाजल्यापासून देणे सुरू केले जाणार आहे.

काय असणार कार्यक्रमात?
‘तू सप्तसूर माझे’, ‘राधा ही बावरी’, ‘मिले सूर मेरा तुम्हारा’, ‘लागी करेजवा’, ‘कोन्यात झोपली सतार’, बेगम अख्तर गझल - ए मोहोब्बत’, राज्याभिषेक गाणे, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘पाडाला पिकलाय आंबा’ या काही गाण्यांचे स्वर घुमतील. पण याही पलीकडे आणखीन लोकप्रिय गाण्यांचा समावेश या कार्यक्रमात असणार आहे. गप्पांबरोबर संपूर्ण गीताचा आनंद रसिक प्रेक्षकांना घेता यावा, यासाठी मंदार आपटे, माधुरी करमरकर या यशस्वी गायकांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. प्रणव हरीदास हे बासरी वादन आणि या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करणार आहेत. सौरभ शिर्के, दीपक वझे, हर्ष परमार, चेतन परब यांची साथ संगत या कार्यक्रमाला लाभणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com