

वाशी, ता. २६ (वार्ताहर) : मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित केलेली जिजाऊ रथयात्रा सोमवारी (ता. २८) वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून ‘मराठा जोडो’चा संदेश दिला जाणार असून, समाजामध्ये एकता, सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
शहाजी महाराज जयंतीनिमित्त १८ मार्चला छत्रपती संभाजीनगरमधून सुरू झालेल्या ‘जिजाऊ रथयात्रे’चा समारोप १ मेला पुण्याच्या लाल महाल येथे होणार आहे. ही रथयात्रा सध्या नवी मुंबईच्या दिशेने येत असून, सोमवारी सकाळी ८.३० वाजता ऐरोली येथे रथयात्रेचा प्रवेश होईल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रथयात्रा पोहोचणार आहे. त्यानंतर पनवेलच्या दिशेने यात्रेचे पुढील प्रस्थान होईल.
------------------
विविध विषयांवर प्रबोधन
जिजाऊ रथयात्रा ही महाराष्ट्रभर ४५ दिवस चालणार असून, विविध जिल्ह्यांतील शहरांमध्ये जनजागृती व संवाद साधला जाणार आहे. संविधान, कायदे, सामाजिक एकता, शेतकरी समस्या, युवकांसाठी रोजगार व शिक्षणाच्या संधी, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर जनप्रबोधन करण्यात येणार आहे. ही यात्रा मराठा समाजासह सर्व बहुजन समाजासाठी खुली असून, अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.