

सहकार चळवळ सशक्त करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे ः मंगल प्रभात लोढा
प्रभादेवी, ता. २६ (बातमीदार) : देशाच्या विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. त्यामुळे सहकार सशक्त करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
सहकार भारती दक्षिण मुंबई आणि जिजाऊ लीगल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रातील महिलांसाठी जागृती आणि रोजगार ही एक काळाची गरज हा कार्यक्रम गिरगांव येथे आयोजित केला होता. त्या वेळेस ते बोलत होते.
या वेळी सहकार भारतीचे महाराष्ट्र संघटन प्रमुख शरद जाधव, सहकार भारतीचे मुंबई अध्यक्ष राहुल पाटील, सहकारी संस्था उपनिबंधक राजेंद्र गायकवाड, जिजाऊ वूमन लीगल फोरमच्या अध्यक्षा ॲड. शुभांगी सारंग, मुंबई उच्च न्यायालयाच्या सिनियर कौन्सिलर ॲड. योगिता मोरे, दिवाकर कोइंडे, ॲड. मंजूला राव, संतोष सुर्वे, आबासाहेब शेडगे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील महिलांचे योगदान, त्यांची भूमिका व रोजगाराच्या संधी या विषयावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.