

विरार (बातमीदार) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि या घटनेत मृत्युमुखी पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विरार शहरातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन करीत कडक शब्दात निषेध नोंदवला. पालघर लोकसभा संघटक पंकज देशमुख आणि जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहरप्रमुख उदय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा संताप व्यक्त करण्यात आला. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राऊत, शिव वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आनंद चोरघे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अजहर खान, शिला लष्करे, प्रदीप साने, सुनील चव्हाण, प्रसाद मिर्लेकर, शशी कदम, जितेंद्र खाडे, उपशहर संघटक रोशनी जाधव, उपशहर अधिकारी रोहित कदम, विभागप्रमुख गणेश धावडे, सुशांत घाग, यश चोरघे, महेश लांजवळ, अजय पिंपळे, रवी राठोड, विनीत चौधरी, स्वप्नील मोरे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.