आंदोलन केल्याने सिनेट सदस्यांसह युवासेना, बुक्टोंच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल

आंदोलन केल्याने सिनेट सदस्यांसह युवासेना, बुक्टोंच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल
Published on

सिनेट सदस्यांसह युवासेना,
बुक्टो पदाधिकाऱ्यावर गुन्हे

आंदोलन भोवले; मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच सिनेटविरोधात गुन्हे

मुंबई, ता. २६ : राज्य विद्यापीठ कायद्याला पायदळी तुडवून मुंबई विद्यापीठ प्रशासन कामकाज करते, निवडून आलेल्या ‍पदवीधर आणि शिक्षक सिनेट सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देत नाही म्हणून त्याविरोधात मुंबई विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या सिनेट सदस्यांसह २३ जणांवर आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलन केल्यावरून पहिल्यांदाच विद्यापीठातील सिनेट सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून याविषयी विद्यापीठ प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
जमावबंदीचे आदेश आणि त्याचे उल्लंघन करून युवासेना आणि बुक्टो या प्राध्यापक संघटनेच्या सिनेट सदस्यांसह त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारी आणि मुंबई विद्यापीठाच्या विरोधात १५ एप्रिलला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील मुख्य प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. त्यातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, असे कृत्य केले म्हणून त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुक्टोच्या ज्येष्ठ नेत्या प्रा. ताप्ती मुखोपाध्याय, प्रा. मधू परांजपे, भीमराज शिकारे यांच्यासह सिनेट सदस्य डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, डॉ. हनुमंत सुतार, अनुपमा सावंत, सखाराम डाखोरे, शशिकांत झोरे, राजेंद्र कोळंबेकर, प्रदीप सावंत, अल्पेश भोईर, डॉ. जितेंद्र गोकुळनाथ झा आदींचा या गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
------
आंदोलनासाठी पहिल्यांदाच गुन्हे
मुंबई विद्यापीठाच्या कलिना आणि फोर्ट संकुल परिसरात विद्यार्थी संघटना, कर्मचारी संघटना तसेच प्राध्यापक संघटना वेळोवेळी आंदोलन करून आपले विषय समोर आणत असतात. काही वर्षांत विद्यापीठाने ही आंदोलने मोडीत काढण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक केले. काही अपवाद वगळता आंदोलनाला परवानगी दिली जात नाही. अशातच विद्यापीठातील पदवीधर, शिक्षक सिनेट सदस्यांनाही हे आंदोलन करण्याची परवानगी नाकारल्याने त्यांनी हे आंदोलन केले. त्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दुसरीकडे, विद्यापीठातील मर्जीच्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले तरी त्यांच्यावर साधी कारवाई करण्यासाठी वाच्यताही केली जात नसल्याचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com