

रोजगारनिर्मितीला
केंद्राचे प्राधान्य : आठवले
मुंबई, ता. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात १० लाख नवीन सरकारी नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवून २०२२ पासून रोजगार मेळावे सुरू केले आहेत. त्याअंतर्गत मुंबईसह देशभरात ४७ ठिकाणी एकाच वेळी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील रोजगार मेळाव्यात शासकीय नोकरीचे नवनियुक्तीचे प्रमाणपत्र रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेळाव्यास उपस्थित होते. या वेळी पोस्ट खाते, गृह मंत्रालय, महसूल, रेल्वे मंत्रालय, उच्च शिक्षण आणि श्रम मंत्रालय आदी विभागांत ४४६ युवकांना रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.