अभ्यासक्रमात युद्धांचा इतिहास हवा
विरार, ता. २८ (बातमीदार) : स्वातंत्र्यानंतर देशाने लढलेल्या युद्धांचा आणि आपल्या सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर अभ्यासक्रमात मुघलांचा नाही तर युद्धांचा समाविष्ट करायला हवा, असे प्रतिपादन मिरा रोड येथे राहणारे शौर्यचक्र सन्मानित कारगिल योद्धा कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी काढले. बँक ऑफ इंडिया बोरिवली रिटायरीज ग्रुपने आयोजित केलेल्या ‘आझादी की जंग, फिल्मों के संग’ या कार्यक्रमाच्या वेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. त्यांच्या प्रेरणादायी भाषणात युद्धविषयीचे थरारक अनुभव ऐकताना श्रोते रोमांचित आणि थक्क झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या अशोक पै यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. रामदास कामत यांनी कार्यक्रम सादर करताना ‘हकीकत’पासून ‘ऊरी-द सर्जिकल स्ट्राइक’पर्यंतचे चित्रपट ज्या युद्धांवर आधारित आहेत, त्यांची सविस्तर माहिती दिली. यात ऑपरेशन कॅक्टस लिली, ऑपरेशन जिब्राल्टर, लोंगेवाला युद्ध, ताशकंद करार, कारगिल युद्ध, गाझी हमला अशा विविध घटनांची रंजक माहिती देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संस्थतर्फे कमांडो मधुसूदन सुर्वे यांचा शाल, रोप आणि भारतमातेची प्रतिमा देऊन अशोक पै आणि प्रल्हाद शिवलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर कुंडणीका राठोड आणि आयूषी मेस्त्री यांच्या हस्ते सुवर्णा सुर्वे यांची साडी चोळी देऊन ओटी भरण्यात आली. संस्थेतर्फे आर्मी वेलफेर फंडाला ७५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. तर प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे ६० हजार रुपयांचा निधी उभारून देणगी म्हणून दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यात रमण पारकर, स्नेहा कामत, खुशी मेस्त्री आणि इतर कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.