पाण्याविना कोस्टल रोडवरील नारळाची झाडे करपली
पाण्याविना कोस्टल रोडवरील नारळाची झाडे करपली
उरण, ता. ५ (वार्ताहर) ः सिडकोने भेंडखळ व पागोटे गावाजवळ निर्माण केलेल्या पाच किलोमीटरच्या कोस्टल मार्गावर दोन्ही बाजूला करोडो रुपये खर्च करून लागवड केलेली नारळाची झाडे पाण्याविना करपू लागली आहेत. त्यामुळे सिडकोच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
उरण तालुक्यात सिडकोच्या माध्यमातून विकास होत आहे. त्याच अनुषंगाने सिडकोने उरण- करंजा बंदराला जोडण्यासाठी सागरी मार्गाची निर्मिती ही भेंडखळ व पागोटे गावाजवळ केली आहे. सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधराच्या माध्यमातून हाती घेतला. त्याच अनुषंगाने द्रोणागिरी नोड ते जेएनपीए हायवे या पाच किलोमीटरच्या सागरी मार्गावरील दोन्ही बाजूला करोडो रुपये खर्च करून नारळाची चार हजार झाडांसह इतर विविध जातींच्या झाडांची लागवड ही ठेकेदारांच्या माध्यमातून केली. काही नारळाची झाडे चांगल्या प्रकारे वाढली आहेत; परंतु सिडकोच्या ठेकेदाराकडून या झाडांना पाणी दिले जात नसल्याने काही ठिकाणची झाडे पाण्याविना करपू लागली आहेत. त्यामुळे शासनस्तरावर खर्च केलेले करोडो रुपये वाया जात आहेत. विशेष म्हणजे, रस्त्याच्या काही ठिकाणी केरकचरा टाकला जात आहेत. तसेच येथील सुक्या गवताला आग लावण्यात येत असल्याने झाडे जळून जात आहेत. त्यामुळे या झाडांकडे सिडकोने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची निगा राखणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.