कनिष्ठ महाविद्यालये संकटात
कनिष्ठ महाविद्यालये संकटात
अकरावीच्या एक लाख ३६ हजार जागा रिक्त
संजीव भागवत
मुंबई, ता. ६ : राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांत अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत; मात्र मुंबई महानगरक्षेत्रात गेल्या शैक्षणिक वर्षांत दोन हजार ५११ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या चार लाख नऊ हजार ९९५ जागांपैकी तब्बल एक लाख ३६ हजार पाच जागा रिक्त राहिल्या. या रिक्त जागांमुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालये संकटात सापडल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगरक्षेत्रात गेल्या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान आणि ‘एचएसव्हीसी’ या शाखांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीने प्रवेश पार पडले. यात मुंबईतील अल्पसंख्याक आणि नामांकित महाविद्यायालयांचा अपवाद वगळता नवीन आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश होऊ न शकल्याने ती ओस पडल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली. यंदा नव्याने काही संस्थाचालकांनी अकरावीच्या प्रवेशासाठी शुल्कवाढ, त्यासोबतच तुकडीवाढ आणि नवीन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यांना ही मान्यता मिळाल्यास अकरावीच्या रिक्त राहणाऱ्या प्रवेशाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत गेल्यावर्षी सर्वाधिक अशा ६५ हजार ७४९ जागा वाणिज्य शाखेच्या रिक्त राहिल्या. त्याखालोखाल विज्ञान शाखेच्या ४१ हजार ४४ आणि कला शाखेच्या २७ हजार २०५ जागांवर प्रवेश होऊ शकले नव्हते. तर काही संस्थाचालकांच्या हितासाठी सुरू असलेल्या ‘एचएसव्हीसी’ या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या चार हजार ८९५ जागा असताना त्यातील दोन हजार ४९९ जागांवरच प्रवेश होऊ शकले आणि तब्बल दोन हजार ३९६ जागा रिकाम्या राहिल्या.
अशा राहिल्या जागा रिक्त
कला शाखा
महाविद्यालये उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
४९१ ५३,६७० २६,२०५ २७,२०५
वाणिज्य शाखा
महाविद्यालये उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
१,०७९ २,११,११० १,४५,३६१ ६५,७४९
विज्ञान शाखा
महाविद्यालये उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
८०२ १,४०,३२० ९९,८७६ ४१,०४४
एचएसव्हीसी शाखा
महाविद्यालये उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
१३९ ४,८९५ २,४९९ २,३९६
--
एकूण
महाविद्यालये उपलब्ध जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
२,५११ ४,०९,९९५ २,७३,९४१ १,३६,०५४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.