उद्यानात पाणी भरल्याने मुलांच्या आनंदावर विरजण

उद्यानात पाणी भरल्याने मुलांच्या आनंदावर विरजण

Published on

खारघर, ता. ८ (बातमीदार) : अवकाळी पावसामुळे तळोजा वसाहतीमधील सेक्टर नऊ आणि सेक्टर १४मधील उद्यानाला तलावाचे स्वरूप आले आहे. उद्यानातील खेळण्यांभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुलांना खेळापासून दूर राहावे लागणार आहे.
तळोजा फेज एक वसाहतीत काही सेक्टरमध्ये उद्याने आणि मैदाने आहेत; परंतु ही उद्याने सिडको आणि पालिकेकडून विकसित केली नसल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, पनवेल महापालिकेने काही दिवसांपूर्वी सेक्टर नऊमधील प्लॉट क्रमांक सहा आणि सेक्टर १४ येथील प्लॉट क्रमांक ९२मधील उद्यान विकसित करून पथदिवे, मुलांसाठी खेळणी, कसरतीसाठी जिम आणि उद्यानात हिरवळ तयार करणे, आदी कामांसाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली. एजन्सीकडून उद्यानातील मोडकळीस आलेल्या खेळण्यांची दुरुस्ती; तर काही खेळणी नव्याने बसविली आहेत. त्यात शाळेला सुट्टी पडल्यामुळे उद्यानात सकाळ-संध्याकाळी पालकांसह लहान मुलांची गर्दी असते; मात्र ज्या ठिकाणी खेळणी बसविण्यात आली आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी निचरा करण्यासाठी पालिकेने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्यामुळे उद्यानाला तलावाचे स्वरूप आले आहे. अशीच अवस्था खारघरमधील काही उद्यानांची झाली आहे. खेळण्यांभोवती तुंबलेले पाणी निचरा होण्यास आणि परिसर सुकण्यासाठी चार ते पाच दिवस लागणार असल्यामुळे मुलांना खेळापासून वंचित राहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com