रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम

रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम

Published on

ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार)ः ठाणे, कल्याण शहरातील ६,३२७ रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम वारंवार मोडले आहेत. अनेकांनी ४०० हून अधिक वेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत. त्यामुळे अशा रिक्षांचे परवाने रद्द करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला यादी पाठवल्याने रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम लागणार आहे.
रिक्षाचालकांचे प्रवाशांसोबत होणारे वाद नवे नाहीत. जवळचे भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे, प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी वाहतूक करणे असे अनेक प्रकार बहुतांश रिक्षाचालकांकडून घडत आहेत. अशा रिक्षाचालकांच्या मुजोरीपणाला लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ऑनलाइन दंड आकारला आहे. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करणे सुरूच आहे. महत्त्वाचे म्हणजे, अनेक रिक्षांवर ४०० हून अधिकवेळा वाहतुकीचे नियम मोडल्याचे दंड आकारले गेले आहेत, पण त्यांच्याकडून दंडाची रक्कम भरण्याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूक विभागाने ही बाब गांभीर्याने घेताना अशा रिक्षांचे परवाने रद्द करावेत, अशी विनंती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला (ता. ७) पत्र पाठवून केली आहे.
---------------------------------------------------
ऑनलाइन पाठवला दंड
ठाणे आणि कल्याणमधील हजारो रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी ऑनलाइन दंड लावला आहे. त्यातील ६,३२७ रिक्षाचालक वाहतूक नियम भंग करण्याचे गुन्हे वारंवार करत असल्याचे दिसून आले आहे. अशा रिक्षाचालकांवर तब्बल २२ कोटी ३७ लाख ८७ हजारांचा दंड लावला आहे.
-----------------------------------------
ठाणे, भिवंडी, मुंब्रा आघाडीवर
वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये भिवंडी, मुंब्रा आणि ठाणे स्थानक परिसरातील रिक्षाचालक आघाडीवर आहेत. तसेच २० ते ५०० वेळा दंड लावण्यात आलेल्या रिक्षांची संख्या ४,६४१ एवढी असून, त्यांना १८,५६,३२,७०० रुपयांचा ऑनलाइन दंड पाठवला आहे.
---------------------------------------
कल्याणातील दोषी रिक्षाचालक
कल्याण आरटीओ परिक्षेत्रात ५० ते १०० वेळा दंड लावण्यात आलेल्या ६९ आणि २० च्यापुढील १,६८६ रिक्षा आहेत. वाहतूक विभागाने रिक्षांवर ३, ८१,५४,४१५ एवढा ऑनलाइन दंड आकारला आहे.
----------------------------------
वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षांची यादी वाहतूक विभागाने प्रादेशिक परिवहन विभागाला पाठवली आहे. अशा रिक्षांचे वाहतूक परवाने रद्द करावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे.
- पंकज शिरसाट, उपआयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर
-------------------------------------------
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १० रिक्षा :
एमएच ०४ - जीएन ४३९६ २६८ वेळा
एमएच ०४ - जेक्यू ३७७० - २७४ वेळा
एमएच ०४ - एचजे २४१९ - २७६ वेळा
एमएच ०४ - जेएच ७९६३ - २७८ वेळा
एमएच ०४ - केएक्स १५९०- ३०९ वेळा
एमएच ०४ - एचजे ३२४८ - ३१८ वेळा
एमएच ०४ - केए २५०६ - ३३४ वेळा
एमएच ०४ - जेक्यू १२०८ - ३५६ वेळा
एमएच ०४ - जेएच ८२४८ - ४१९ वेळा
एमएच ०४ - जेक्यू ६३८५ - ४५४ वेळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com