बनावट नोटांचे षडयंत्र
ठाणे/भिवंडी, ता. १० (बातमीदार): शहरात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलिस पथकाने केला होता. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ४५ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्यानंतर या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यात पोलिस यंत्रणा लागली आहे.
भिवंडीतील अवचित पाडा येथील मकदुमीया कॅफेजवळ काही व्यक्ती बनावट नोटा देऊन खऱ्या नोटा घेण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक-२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज केदार यांच्यासह पोलिस पथकाने ३ मे रोजी सापळा रचून सूरज, भरत आणि स्वप्नील यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून ५०० च्या बनावट नोटांचे ६० बंडल सापडले होते. प्रत्येकी १०० नोटा असे ३० लाख रुपये जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत रामदास, विजय व शेखर यांच्यासोबत बनावट नोटा तयार करण्याचे रॅकेट उघड झाले. त्या तिघा साथीदारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५ मे रोजी सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली. तसेच बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेला लॅपटॉप, प्रिंटर, बनावट नोटांसाठी वापरलेले कटर, नोटा छापण्यासाठी लागणारे बॉन्ड पेपर, १५ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटांसह साहित्य जप्त केले आहे, पण या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील आणखी काही भागांमध्ये असे प्रकार सुरू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----------------------------------------------
उच्चशिक्षित दळवी सूत्रधार
एमएससी असलेल्या दळवीला प्रिंटिंगचे ज्ञान होते. त्याच्याच ट्रान्सपोर्ट कार्यालयात नोटा छापल्या जात होत्या. नोटा छापण्याचा हा त्याचा पहिलाच प्रयत्न असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच दळवी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त जाधव यांनी सांगितले.
--------------------------------------------
पोलिस पथकाची दमदार कामगिरी
कारवाईसाठी पोलिस उपनिरीक्षक श्रीराज माळी, रवींद्र पाटील, राजेश शिंदे, सुधाकर चौधरी, पोलिस हवालदार सुदेश घाग, प्रकाश पाटील, साबीर शेख, सुनील साळुंखे, प्रशांत राणे, राजेश गावडे, किशोर थोरात, नीलेश बोरसे, सचिन जाधव, माया डोंगरे, दक्षता सुतार, सायली गंभेरा, अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार आदी पोलिस पथकाने केली आहे.
--------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.