खरिपाच्या तयारीला वेग

खरिपाच्या तयारीला वेग

Published on

विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यात ९४ पैकी ८६ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. यंदा विक्रमगडमध्ये खरीप हंगामात सुमारे सात हजार ५२० हेक्टरवर भातपेरणी केली जाणार आहे. त्यामुळे पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. यासाठी सुमारे ३०१ टन भाताचे बियाणे लागणार असल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच दोन हजार ६१५ टन खतांची मागणी असणार आहे, असे सांगण्यात आले.

यंदाचा पावसाळा सुरू होण्यासासाठी महिनाभराचा कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील तालुक्यातील पेरणीचे नियोजन, त्यासाठी लागणारे बियाणे आणि खतसाठ्याच्या मागणीचे नियोजन तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे. परिणामी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

आजच्या महागाईच्या जमान्यात जास्त उत्पन्न देणारी कमी खर्च आणि अल्प मेहनतीने आधुनिक अवजारांचा वापर करून शेती करणे गरजेचे झाले आहे. यासाठी सरकारनेही शेतकऱ्यांकरिता अनेक योजना आणल्या आहेत, पण त्याचा योग्यरित्या फायदा विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागातील शेतकऱ्यांनी झाला नसल्याने अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. आता शेतकऱ्यांनी सरकारच्या मदतीची वाट न बघता शेतीचे स्वरूप बदलावे, असे आवाहन तज्ज्ञ शेतकरी मंडळीकडून करण्यात येत आहे.

आज फुलशेती, हळदशेती, मस्यशेतीलासुद्धा चांगला वाव आहे. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही शेती केली जात आहे. विक्रमगड तालुक्यातील ८६ गाव-पाड्यांतील सात हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रांवर कंपन्यांची सुधारित भातांच्या विविध वाणांची लागवड केली जात आहे. आता शेतकरी जुनाट वाणांची लागवड न करिता सुधारित वाणांची लागवड करून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, परंतु गेल्या चार वर्षांमध्ये तालुक्याच्या भातलागवडीचे क्षेत्र वाढण्याऐवजी घटत चालले आहे. तरुणांनी आपला पारंपरिक व्यवसाय चार महिने सांभाळणे गरजचे आहे.

पावसाळ्यामध्ये भाताचीच लागवड
पावसाळ्यात भाताबरोबरच नाचणी, वरी, उडीद ही पिके घेतली जातात, परंतु या पिकांच्या उत्पादनात वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भातशेतीची लागवड केली जाते. ती मुख्यत: भातशेतीची असून, ही लागवड पारंपरिक पद्धतीनेच आजही ग्रामीण भागात केली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे आणि न परवडणारी शेती ठरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com