महामार्गावर आठवडा बाजार

महामार्गावर आठवडा बाजार

Published on

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावरील खडवली फाट्यावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. असे असताना पडघा ग्रामपंचायतीकडून भरणारा आठवडा बाजार महामार्गालगतच्या परिसरातील शेतकरी जीव धोक्यात घालून माल विकण्यासाठी बसत आहेत, पण महसूल, पोलिस आणि महामार्ग यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.
भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाने पडघा ग्रामपंचायतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने गोदामे उभारली आहेत. त्यामुळे पडघा ग्रामपंचायत क्षेत्रात लोकवस्ती वाढली आहे. पूर्वीपासून पडघा गावात परिसरातील शेतकरी शेतमाल, भाजीपाला, कडधान्ये विक्रीसाठी पडघा गावातील आठवडा बाजारात येत होते, परंतु गेल्या काही वर्षांपासून हा आठवडा बाजार महामार्गावर भरत असल्याने सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असलेल्या महामार्गाच्या कडेला वाहनांचे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे रविवारी या मार्गावर कोंडी होण्याचे प्रमाण वाढले असून, हा प्रकार भविष्यात अपघाताला निमित्त ठरण्याची शक्यता आहे.
---------------------------------------------------------------------
गुरचरण जमिनीवर अतिक्रमण
पडघा ग्रामपंचायतीकडे ११५ एकर गुरचरण जमीन आहे. त्यापैकी १०० एकर जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. शिल्लक १५ एकर जमिनीपैकी काही जमीन शिर्डीच्या साई संस्थानला दिली आहे, तर काही जमिनीवर अतिक्रमण होऊनही गुरचरण जमीन शिल्लक आहे, मात्र ही जमीन दोन किलोमीटर दूर असल्याने बाजार भरवल्यास प्रतिसाद मिळणार नसल्याने व्यावसायिक आणि ग्राहक जाण्यास तयार नाहीत. लोकवस्तीच्या जवळ बाजारासाठी गावाजवळील गुरचरण जागेतील अतिक्रमण महसूल विभागाने दूर करणे गरजेचे आहे.
--------------------------------------
बाजार बंद करण्याची मागणी
बाजारातील नागरिकांच्या जीवाला झालेला धोका लक्षात घेऊन स्थानिक आणि महामार्ग पोलिस यांनी महामार्गावरील बाजाराचे अतिक्रमण दूर करून वाहतूक नियमित केली पाहिजे. समृद्धी महामार्गासह राज्यशासनाचे विविध रस्ते उपक्रम या मार्गावरून सुरू होणार असल्याने भविष्यात हा धोका वाढणार असून, आहे. त्यामुळे ‘वाहुली गाव विकास प्रतिष्ठान’ संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी हा बाजार बंद करण्याची मागणी सरपंच ग्रामपंचायत पडघा, तहसीलदार भिवंडी, पोलिस निरीक्षक पडघा पोलिस ठाणे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
पर्यायी जागेसाठी शोधमोहीम
महामार्गावरील आठवडा बाजारासाठी पर्यायी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या गुरचरणाची जागा लोकवस्तीपासून फार दूर आहे. पडघा वन विभागाचे कार्यालय ग्रामपंचायतीच्या गुरचरण जागेत आहे. तेथे गावासाठी मार्केट होऊन आवश्यक असल्यास आठवडा बाजारदेखील भरवता येईल. यासाठी खडवली रोडवर असलेल्या दोन एकर जागेवर वन विभागाच्या कार्यालयासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच रवींद्र विशे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com